शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- शिर्डी येथील जवळ रुई शिवारात मध्ये अनैतिक संबंधातून विवाहित तरुणीचा धारदार चाकूने वार करीत खून केला आहे. त्यामुळे रुई येथे मोठी खळबळ उडाली आहे.
रुई येथे अनैतिक संबंधातून विवाहित तरुणीचा धारदार चाकूने वार करीत केला खून
सदरची माहिती अशी आहे की, नाशिक (एकलहरे ) सविता सुनील बत्तीशे ( वय २० ) या तरुणीचे रुई शिवारात राहणारा अजय राजेंद्र म्हस्के या तरुणा बरोबर प्रेम प्रकरणातून अनैतिक संबंध होते. मयत सविता हिचे २०१३ ला नाशिक येथील एकलहरे या गावी सुनील माणिक बत्तीशे या तरुणाबरोबर विवाह झाला होता. काही काळानंतर दोघांचा संसार हा गुनागोविंदा चालू होता. त्यांना एक मुलगा एक मुलगी पण होती.
परंतु काही काळानंतर मयत सविता हिच्या घराजवळ आरोपी अजय याच्या मामाचे घर होते. त्यामुळे तेथे त्याचे येणे जाणे होते. मामाच्या घरी कायमस्वरूपी येणे जाणे असल्यामुळे मै सविता हिच्या बरोबर अजयची ओळख झाली. ह्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या तीन वर्षांपूर्वी मयत सविता हिने आपले मुले व पतीला सोडून आरोपी अजय बरोबर रुई येथे भोपळेवाडी वस्तीवर राहण्यास आली.
सुरुवातीच्या काळामध्ये अजय हा सविता हिला जपत असे. परंतु काही कालांतरानंतर आरोपी अजय याला दुसऱ्या मुली बरोबर लग्न करायचे आहे. म्हणून तो मयत सविताला मारहाण व शिवीगाळ करत असे. या मारहाणीची व त्रास देण्याची तक्रार देखील सविता येणे शिर्डी पोलीस स्टेशन येथे केली होती. परंतु आरोपी अजय याने तिची समजूत घालून तिला घरी नेले. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी अजय याने मयत सविता विचार बरोबर नेहमी वादाला कंटाळून. त्याने तिला संपवण्याचे ठरविले.
आरोपी अजय याने सविता हिच्यावर धारदार चाकूने सपासवार करत तिचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी हा स्वतःहून शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर झाला आहे. पोलिसांना खुनाची कबुली देताच मुलीचे देखील चक्रावली आहेत. सदर गुन्ह्याची कबुली देताच शिर्डी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी तक्रार नोंदवून घेत. गुन्ह्याचा पुढील तपास करण्याचे आदेश दिले आहेत.



