spot_img
spot_img

आरोग्याच्या दृष्टीने शेतकरी बांधवांनी रासायनिक शेती ऐवजी पंचद्रव्यांचा वापर करून सेंद्रियशेतीस प्राधान्य द्यावे- सौ शालिनीताई विखे पाटील

राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):-आरोग्याच्या दृष्टीने शेतकरी बांधवांनी रासायनिक शेती ऐवजी पंचद्रव्यांचा वापर करून सेंद्रियशेतीस प्राधान्य द्यावे शेतात पौष्टिक तृणधान्याची अधिकाधिक पिके घेणे गरजेचे आहे तसेच कॅन्सर मधुमेह उच्च रक्तदाब यासारख्या आजारांना दूर ठेवण्याकरिता प्रत्येकाने रोज पौष्टिक तृणधान्ययुक्त आहारास अधिक महत्त्व द्यावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले

आदर्श गाव खडकेवाके ग्रामपंचायतच्या सभागृहात महाराष्ट्र शासन कृषी विभाग आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 व राष्ट्रीय कृषी विकास योजना व महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान अंतर्गत शेतकरी बांधवांना रब्बी ज्वारी बियाणे वाटपाचा कार्यक्रम सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड मंडल अधिकारी प्रशांत वाकचौरे, सरपंच सौ संगीताताई सचिन मुरादे, उपसरपंच जालिंदर मुरादे ,पोलिस पाटील रावसाहेब लावरे पाटील, विविध सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन जालिंदर मुरादे गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सचिन मुरादे, केलवड पोलीस पाटील सुभाष गमे, पी डी पाटील, ॲड अशोक वाघ, कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता, प्रकल्प अधिकारी रुपाली लोंढे, बाबासाहेब कांदळकर संचालक ग्रामपंचायत सदस्य दिपक गायकवाड, रवी सुरासे, सोमनाथ मुजमुले, कविता लावरे, राजेंद्र मुरादे, रमेश गायकवाड, बाळासाहेब लावरे,बि टी मुरादे, बापु मुरादे, ग्रामसेवक रुपाली निर्मळ, सुनीता धनवटे सुभाष यादव अण्णासाहेब मुजमुले नरेंद्र मुरादे, गोरक्षनाथ लावरे, सुदाम लावरे, कृषी पर्यवेक्षक विनय भाकरे, संजय बोंबे, कृषी सहायक संदीप गायकवाड, राहुल उगले, नितिन शिंदे, किरण धुमाळ किरण शिंदे श्रीमती पूनम चौधरी, श्रीमती वैशाली पुंड, श्रीमती संध्या महागडे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की पौष्टिक तृणधान्य शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे याचे महत्त्व नागरिकांना समजावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वर्ष पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे तृण धान्यांमध्ये कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना रोखण्याची ताकद आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने पौष्टिक तृण धान्याला अधिक महत्त्व द्यावे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात कुटुंबासाठी परसबाग संकल्पना राबवावी त्यामध्ये कुटुंबाकरिता गोमूत्र ताक गुळ सह पंचद्रव्यांचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त शेती करावी रासायनिक द्रव्यांच्या फवारणीमुळे कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून हे रोखण्या करिता सेंद्रिय शेती काळाची गरज आहे किमान कुटुंबाकरिता त्याचा अवलंब होणे महत्त्वाचे आहे महिला भगिनी अत्यंत काटकसरीने आपला प्रपंच करत असतात शेती करताना सुद्धा त्यांनी सेंद्रिय शेतीला अधिक महत्त्व द्यावे त्याचबरोबर रब्बी तील ज्वारी तसेच इतर पिके घेताना काळजी घ्या चुकीची जीवनशैली अपवाद वगळता अनेकांना गहू तांदूळ यासारख्या धान्यांमुळे रक्तदाब व मधुमेहासारख्या समस्या उद्भवत आहे त्यामुळे रोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्याला अधिका अधिक महत्त्व द्या व आरोग्य अबाधित ठेवा असे आवाहन यावेळी सौ शालिनीताई विखे पाटील यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी कृषी विभागाचे अधिकारी विलास गायकवाड तसेच पायऱ्यांचे कृषी शास्त्रज्ञ डॉ देशमुख यांनी उपस्थित महिला व पुरुष बांधवांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार जालिंदर मुरादे यांनी मानले

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!