spot_img
spot_img

श्रीरामपूर बाजार समितीत पेरूला उच्चांकी ६० रुपये किलो भाव !

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- सध्या श्रीरामपूर बाजार समिती आवारात फळ व भाजीपाला लिलावात कांदा डाळिंब गवार मेथी कोथिंबीर यांना जादा भाव मिळत असून विशेष म्हणजे डाळिंबाबरोबरच आता पेरूनेही भावात उचल खाल्ली आहे ज्येष्ठ पत्रकार शेतकरी मनोज कुमार आगे यांनी त्यांच्या शिवशंकर मळ्यातील पेरू आज बाजार समितीत याकूबाई बागवान यांच्या लिलाव केंद्रावर विक्रीसाठी आणले होते.

विशेष म्हणजे या पेरूला आज रविवारी उच्चकी भाव मिळत ६०रुपये प्रति किलो दाराने होलसेल भाव मिळाला ! गेल्या आठ दिवसापासून पेरू लिलावासाठी नेण्यात येत होते .सुरुवातीला 35 रुपये दर मिळाला नंतर ४० रुपये व आज विक्रमी ६० रुपये दर मिळाला त्यामुळे डाळिंबाबरोबरच पेरू नेही आज भाव खाल्ला ! यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ पत्रकार शेतकरी मनोज आगे म्हणाले की शेतकऱ्यांनी सर्वांनी सोयाबीन लावणे !सर्वांनी कांदा लावणे ! सर्वांनी ऊस लावणे !सर्वांनी गहू करणे ! या ऐवजी शेतीचे योग्य नियोजन करून वेगवेगळी पिके घेऊन थोडी थोडी पिके घेऊन तीही चांगल्या दर्जाची पिके घेतल्यास शेतकऱ्यांना निश्चितच चांगला दर मिळेल .माजी उपनगराध्यक्ष याकूबाई बागवान यांनी सांगितले की आजचा हा पेरूचा दर विक्रमी असल्याने चांगला माला असल्यावर निश्चितच चांगला दर मिळतो हे आगे यांच्या पेरू वरून दिसून येत . श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती नवले यांनीही शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रमाणीक प्रयत्न करावेत असे सांगीतले .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!