नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा बुद्रुक शिवारात सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमात भाद्रपद वद्य एकादशीच्या निमित्ताने आयोजित कीर्तन सोहळयास भाविकांचा प्रतिसाद मिळाला.
भाद्रपद वद्य एकादशीच्या निमित्ताने आयोजित कीर्तन सोहळयाच्या प्रसंगी सकाळी ८ वाजता सदगुरू नारायणगिरी महाराज मंदिरातील विठ्ठल रुख्मिणी,हनुमंतराय,श्री गणेश यांच्यासह सदगुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या मूर्तीस उध्दव महाराज मंडलिक यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक करण्यात आला.
यावेळी झालेल्या कीर्तन सोहळयातळयात बोलतांना ज्ञानेश्वर महाराज लिपने म्हणाले की काळाने कोणालाही सोडले नाही म्हणून संसार व परमार्थ हा विचाराने करा, पृथ्वी लोकांवर विचारी व अविचारी हे दोन प्रकारचे वर्ग आहे,श्री गुरू करतांना हजार वेळा विचार करा,साधूचे अंतःकरण पहावयाचे असल्यास ते आमच्या सारख्या कीर्तनकारांना घडविणाऱ्या महंत उध्दव बाबांमध्ये पहावे असे गौरवोदगार त्यांनी यावेळी बोलताना काढले.
जगातील भगवंत परमात्मा ही नित्य वस्तू असून त्याचे नाम हे सार आहे,प्रपंच हा होत असतो तर परमार्थ हा करावा लागतो मनुष्य जिवाच्या उद्धारासाठी संत संगतीत राहून परमार्थ करा,संकटातून बाहेर पडण्यासाठी भगवंत नामाचे चिंतन कराअसे आवाहन त्यांनी केले.यावेळी उपस्थित भाविकांना देवळाली प्रवरा येथील संतसेवक प्रभाकर एकनाथ ढूस यांच्या वतीने फराळाचा महाप्रसाद वाटण्यात आला.
यावेळी विश्वनाथ महाराज मंडलिक,नाना निर्मळ,नामदेव शिंदे , सुदामराव बनसोडे,ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव शिंदे,लक्ष्मीनारायण जोंधळे,रखमाजी नाचन, बाळासाहेब झिने,आसाराम नळघे, भाऊसाहेब येवले,दशरथराव मुंगसे,बदाम पठाडे,गोरक्षनाथ पठाडे,बंडू शिरकुले विद्यार्थी सेवेकरी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



