नगर( जनता आवाज वृत्तसेवा ):– नगर शहरामध्ये दहावी व बारावीची बनावट गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, तसेच विविध विद्यापीठांच्या नावाने बनावट पदवी, शाळांचे बनावट दाखले तयार करून नगरमध्ये ५० ते ६० हजार रुपयांना विक्री केल्या प्रकरणी नगर शहरातील रुद्र एज्युकेशन सोसायटीच्या पॅरामेडिकल कॉलेजमधील अशोक नामदेव सोनवणे (३७, रा. द्वारकाधीश कॉलनी, भिंगार) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून काही गुणपत्रिका, प्रमाणपत्रे, दाखले, मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याला न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, आरोपीला वीस पर्यंत पोलिस कोठाडी, 182 बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी केले जप्त
या प्रकरणी विशाल पारधे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली होता. सोनवणे याने दिलेल्या तक्रार करीतम्हटले होती. अशोक सोनवणे याने बीएससी एमएलटीचे बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली आहे. पारधे याच्या अर्जदाची दखल घेत तोफखाना पोलिसांनी या अर्जाची चौकशी करत पारधे यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर अशोक सोनवणे यास चौकशीसाठी बोलावले.
चौकशी सुरू असतानाच सोनवणे यास मोबाईलवर आलेल्या कॉलचा संशय आल्याने पोलिसांनी फोनची माहिती घेतली. कुरिअर कंपनीचा फोन असल्याचे समजताच पोलिसांनी कुरिअर कंपनीच्या कार्यालयात जाऊन आलेले पार्सल ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेची इयत्ता दहावी व बारावीची प्रमाणपत्रे आढळून आली. ती बनावट असल्याचे समोर आले. आरोपी सोनवनेेला कोर्टाने २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या बोगस प्रमाणपत्र रॅकेटचे धागेदोरे हे दिल्लीपर्यंत पोहोचलेले आहे. दिल्लीतील सचिन व चेतन शर्मा या दोघांकडून बनावट प्रमाणपत्र तयार करून घेत असल्याचे आरोपी अशोक सोनवणे यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीत फोन करून संपर्क करीत असलेल्या नंबरची कॉल डिटेल्स काढले आहे. या प्रकरणात सुमारे १८२ बनावट प्रमाणपत्र पोलिसांनी जप्त केली आहेत. या रॅकेटमध्ये अजून कोण कोण आहेत याची पोलीस यंत्रणा तपास करत आहे. नगर मधील शिक्षण क्षेत्रातील हे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



