टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान गावचे भूमिपुत्र व भुषण भारतीय कबड्डी संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू. एशियन गेम्स २०२३ सुवर्ण पदक विजेता अस्लम इनामदार यांचा भव्य नागरी सत्कार गुरूवार दिनांक १२ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
ताई प्रतिष्ठाण, ओन्ली साई कबड्डी क्लब, पत्रकार संघ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला सत्कार सोहळा टाकळीभान ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न होत असल्याची माहिती उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी दिली आहे.
या सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सिध्दाराम सालीमठ जिल्हाधिकारी अहमदनगर, शशिकांत गाडे उपा.महा.राज्य कबड्डी असोसिएशन,दिलीप दिघे जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर, विठ्ठलराव लंघे भाजपा जिल्हाध्यक्ष, अहमदनगर, नितीन दिनकर भाजपा श्रीरामपूर विधानसभा प्रमुख,.ज्ञानेश्वर खुरंगे राज्य क्रीडा मार्गदर्शक, किरण सावंत प्रांताधिकारी श्रीरामपूर, मिलींद वाघ तहसीलदार, श्रीरामपुर, प्रविण सिनारे गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीरामपूर, राकेश ओला पोलिस अधिक्षक अहमदनगर, मौलाना अहमद शेख, सरपंच अर्चनाताई रणनवरे, बाबुराव चांदेरे सरकार्यवाहक महा.राज्य कबड्डी असोसिएशन, सचिन भोसले कार्या. प्र.महा. राज्य कबड्डी असोसिएशन, दिपक अण्णा पटारे भाजपा तालुकाध्यक्ष श्रीरामपूर, माजी सभापती नानासाहेब पवार पंचायत समिती श्रीरामपूर, माजी सरपंच मंजाबापु थोरात, जाकेरा इनामदार उपस्थित राहाणार आहेत.
या सत्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन उपसरपंच कान्हा खंडागळे, ताई प्रतिष्ठाण, ओन्ली साई कबड्डी क्लब, पत्रकार संघ व समस्थ ग्रामस्थ टाकळीभान यांनी केले आहे.



