लोणी दि.११( जनता आवाज वृत्तसेवा ):-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अहमदनगर विभागीय क्रीडा समिती यांच्या अंतर्गत मराठा विद्या प्रसारक मंडळाचे न्यू आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज पारनेर येथे संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेमध्ये प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाने चार रौप्य पदकांची कमाई केली.अशी माहीती प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने यांनी दिली.
या स्पर्धेत अनंत घोगरे – ७५-८० वजन गटात रौप्य पदक,विक्रम मोहिते- ६० -६३ वजन गटात रौप्य पदक, जतीन लाल – ८६ – ९२ वजन गटात रौप्य पदक, वेदांती येवले – ५५-५८ वजन गटात रौप्य पदक, रितेश धावणे -६३ -६७ वजन गटात उत्कृष्ट कामगिरी केली.
या खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. श्रीनिवास मोतीयेळे, बॉक्सिंग चे प्रशिक्षक संदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील,संस्थेचे सहसचिव भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, संस्थेचे संचालक डॉ प्रदीप दिघे,शिक्षण संचालक प्रा. लीलावती सरोदे, सहशिक्षण अधिकारी प्रा. नंदकुमार दळे, संस्थेचे क्रीडा संचालक डॉ प्रमोद विखे पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ विजय राठी,जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ राजेंद्र देवकाते यांनी अभिनंदन केले.




