17 C
New York
Wednesday, October 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

वैजापूर भाजप तालुकाध्यक्षपदी नारायण कवडे यांची निवड

वैजापूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- भाजपाच्या वैजापूर तालुकाध्यक्षपदी  परसोडा येथील नारायण कवडे यांची निवड करण्यात आली आहे.

तालुकाध्यक्ष  पदासाठी तालुक्यातील अनेक जण इच्छुक होते. त्यामुळे खूप मोठी रस्सीखेच सुरू होती. पक्षश्रेष्ठींनी अखेर ग्रामीण चेहरा म्हणून ओळख असणारे नारायण कवडे यांची तालुकाध्यक्ष पदावर निवड केली . नारायण कवडे हे एक उत्तम संघटन कौशल्य असलेले व्यक्तीमत्व आहे. ‘बजरंग दल’ ही हिंदुत्ववादी संघटना त्यांनी तालुक्यातील घराघरात पोहचवली. आजही तालुकाभर त्यांची हजारो युवकांची फळी तयार आहे. त्यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक सुसंस्कृत युवक त्यांच्यासोबत आहे. १९९८ ते २००८ या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली. भाजपाचे राज्य सरचिटणीस संजय केणेकर व जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले.त्यांच्या या निवडी बद्दल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, एकनाथ जाधव,भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ दिनेश परदेशी, डॉ राजीव डोंगरे, जयमाला वाघ,कचरु डिके, कल्याण दांगोडे, कैलास पवार,बाबा चन्ने ,प्रशांत कंगले,नाना गुंजाळ,राजु चव्हाण,सुदाम छानवाल, दिनेश राजपुत, सुरेश राऊत ,वसंत पवार, डॉ विपीन साळे, संतोष आवारे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!