लोणी दि.१२( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा रुरल कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे नुकतीच नाविन्यपूर्ण ऐतिहासिक मुखवटे बनवण्याची कार्यशाळा प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली.यामध्ये विद्यार्थ्यानी मोठा प्रतिसाद दिला.अशी माहीती प्राचार्या तेजश्री ठाणगावकर यांनी दिली.
गुणवत्तापुर्ण शिक्षणांसोबत विविध उपक्रमातून विद्यार्थी घडवितांना त्यांना विविध उपक्रामातून शिक्षण दिले जाते.टाकाऊ पासून टिकाऊ या अंतर्गत वर्तमानपत्र व पुठ्ठा यांचा वापर करून इजिप्शियन, मेसोपोटेमियन आणि हडप्पा संस्कृतीतील काही निवडक मुखवटे या कार्यशाळे दरम्यान विद्यार्थ्यांनी बनवले. या कार्यशाळेसाठी संगमनेर येथील सुप्रसिद्ध कलाशिक्षक विश्वनाथ गाडेकर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेत गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना मुखवटे बनवण्याच्या विविध पद्धती समजावून सांगितल्या. या कार्यशाळेच्या समन्वयक म्हणून प्रा. दिपिका आरबट्टी,प्रा. तेजस्विनी घोलप, प्रा,चारुता सोनपरोते या.प्रा. कपिल बु-हाडे, प्रा. राहुल देशमुख यांनी कार्यशाळेसाठी विशेष परिश्रम घेतले. ही कार्यशाळा संपन्न होण्यासाठी प्राचार्य आर्किटेक तेजश्री ठाणगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.