लोणी दि.१२( जनता आवाज वृत्तसेवा ):-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या अंतर्गत न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेमध्ये प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलींच्या फुटबॉल संघाने उपविजेतेपद प्राप्त केले क्वाटर फायनल मध्ये बोरावके कॉलेजला २-१ तर सेमी फायनल मध्ये सीडी जैन कॉलेजला २-० च्या फरकाने पराभूत करून प्रवरा अभियांञिकी महाविद्यालयाने उपविजेतेपद मिळविले अशी माहीती प्राचार्य डाॅ.संजय गुल्हाने यांनी दिली.
या मध्ये भाग्यश्री बोरसे, ऋतुजा गरजे,आदिती काळे, सेजल मगर, आरती जगताप, दिपाली इष्टके, कोमल कदम, साक्षी उडान, मंजिरी चिंधे, गायत्री घायवट, साक्षी गोरे, मंजुश्री नरोडे, अनुष्का पाटील, निकिता व्यवहारे, तेजस्विनी चिकणे यांच्या संघाने अप्रतिम कामगिरी करून उपविजेते पदावर आपले नाव कोरले. यामध्ये संघाची कर्णधार भाग्यश्री बोरसे, ऋतुजा गर्जे यांची नगर जिल्ह्याच्या झोनल संघामध्ये अंतिमत निवड झालेली असून गोल कीपर साक्षी गोरे हिची देखील निवड जवळपास निश्चित झालेली आहे. तसेच प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांच्या फुटबॉल संघाने देखील संजीवनी कॉलेजला ५-१ मोठ्या फरकाने पराभूत केले, साहिल तांबोळी याने तीन गोल करून तर शुभम श्रीखंडे याने दोन गोल करून आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले.
या खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूचे संस्थेचे अध्यक्ष महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील,संस्थेचे सहसचिव भारत घोगरे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, संस्थेचे संचालक डॉ प्रदीप दिघे,शिक्षण संचालक प्रा. लीलावती सरोदे, सहशिक्षण अधिकारी प्रा. नंदकुमार दळे, संस्थेचे क्रीडा संचालक डॉ प्रमोद विखे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ विजय राठी,जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ राजेंद्र देवकाते यांनी अभिनंदन केले.




