श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातून शहरातील व्यापाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून व्यापाऱ्यांचे हितरक्षण होईल, असा विश्वास अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्री मुरकुटे यांनी व्यक्त केला.
श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्री.पुरुषोत्तम झंवर यांची निवड झाल्याबद्दल लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सौ.मुरकुटे बोलत होत्या. यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील, युवक आघाडीचे रोहन डावखर, गणेश भाकरे, कैलास भागवत, संदिप डावखर आदि उपस्थित होते.




