राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा ):- राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील मुळा नदीपात्रात पोलिसांनी अचानक टाकलेल्या छाप्यात अवैद्य वाळू उपसा करणारे जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले असून पोलिसांना पाहताच आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले.
पोलीस कॉन्स्टेबल सागर नवले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना मिळालेल्या खबऱ्याच्या माहिती आधारे हा छापा टाकण्यात आला. माहितीनुसार दि.१२ जुलै रोजी आम्ही तांदुळवाडी येथील मुळा नदीपात्रात अवैद्य वाळू उपसा सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा एक जेसीबी हा दोन ट्रॅक्टर मध्ये वाळू भरताना दिसून आला.



