लोणी दि.१२( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या चिचोली येथील कै.जनार्धन काळे पाटील विद्यालय येथील तीन मुले आणि तीन मुलीनी १४ व्या राष्ट्रीय ड्रॉप रो बॉल स्पर्धेत नेत्रदिपक यश मिळविले.
हायटेक अभियांत्रिकी महाविद्यालय गाझीयाबाद येथे झालेल्या यामध्ये ट्रीपल इव्हेंट मध्ये विजया कातोरे, साक्षी चिखले, ऋतुजा ओहोळ, सार्थक तोरे, रेहान पठाण, कृष्णा लांबे यांनी नेत्रदिपक यश मिळवले त्यांना क्रिडाशिक्षक हनुमंत गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे,प्रा.नंदकुमार दळे,क्रिडा सणचालक डाॅ.प्रमोद विखे यांनी अभिनंदन केले आहे.




