spot_img
spot_img

तिसगांव सोसायटीच्या चेअरमनपदी प्रकाश कडू यांची बिनविरोध निवड

कोल्हार ( जनता आवाजवृत्तसेवा ) :- राहाता तालुक्यातील तिसगांव -प्रवरा येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश भगवंतराव कडू यांची सर्वानुमते तिसगांव विविध.सह. सेवा संस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली तर सौ. सारिका अरूण कडू यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली.
प. विखे कारखान्याचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. चेअरमन पदाची सुचना विजय कडू यांनी मांडली, त्यास अनुमोदन एकनाथ कडू यांनी दिले. तसेच व्हाईस चेअरमन पदाची सुचना नितीन कडू यांनी मांडली, त्यास अनुमोदन शांताराम डोंगरे यांनी दिले. राहाता येथील संजय पाटील व आर.बी. सदाफळ संस्थेचे सचिव सोपान सातपुते यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. 
याप्रसंगी पोलिस पाटील उत्तमराव कडू, नाना डोंगरे, विजय कडू, डॉ. चंद्रकांत कडू, हरिभाऊ कडू, बंडू कडू, प्रकाश नरोडे, राजीव कडू, सुभाष कडू, शांताराम डोंगरे, उत्तम डोंगरे, नितीन कडू, एकनाथ कडू, रविंद्र डोंगरे, वेणूनाथ कडू, पांडूरंग देशमाने, अरुण कडू, प्रमोद कडू, सचिन कडू, जयंत कडू, सतिश कडू, प्रा.गणेश प्रकाश कडू, बाळू कडू उपस्थित होते.
या निवडीबद्दल महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास व्यवसाय मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अभिनंदन केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!