9.2 C
New York
Monday, October 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

प्रवरेच्या कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून गुहा येथे कांदा व कापूस पिकावरील रोग आणि किड नियंत्रण 

लोणी दि.१३( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालय लोणी येथील अंतिम वर्षात शिकत असलेल्या कृषिदुतांच्या माध्यमातून कांदा व कापूस पिकावरील रोग आणि कीड नियंत्रण याविषयी चर्चासत्राचे गुहा येथे आयोजन करण्यात आले होते. 

या चर्चासत्रास शुभम कडलग,कार्यक्रम समन्वयक डॉ. रमेश जाधव यांनी कांदा आणि कापूस पिकावरील रोग व कीड नियंत्रण या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कीड व रोग नियंत्रणाची गरज, त्या वरील उपाय व फायदे या विषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी सेवा संस्थेचे चेअरमन केमा कोळसे , सरपंच अरुणाताई ओहोळ,बबनराव कोळसे, राजेंद्र कोळसे, रमेश ठोंबरे, रंगनाथ ओहोळ, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभांगी साळोखे, कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपाली तांबे , डाॅ. विक्रम अनाप यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत सार्थक चव्हाण, आदित्य बोठे, संकेत शेळके, अभिजीत ठोंबरे, आर्य जाधव, प्रतीक ढवळे, आशिष आनप,आणि चैतन्य ढोधरे यांनी प्रयत्न केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!