लोणी दि.१३( जनता आवाज वृत्तसेवा ):- राजस्थान जयपूर येथे झालेल्या ४२ या राष्ट्रीय ज्युनिअर गट शुटींगवॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघातून खेळतांना लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या दाढ बुद्रुक येथीह महात्मा फुले विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडू कु. ममता बाबासाहेब गुळवे हिने उत्कृष्ठ खेळ करत झारखंड, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान या संघांचा पराभव केला अंतीम फेरीत प्रवेश केला अंतीम फेरीत उत्तर प्रदेश या बलाढ्य संघाचा पराभव करून महाराष्ट्र संघास सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. अशी माहीती प्राचार्य डाॅ.राजेंद्र कोबरणे यांनी दिली.
या स्पर्धेत एकूण २७ संघानी सहभाग घेतला. ममता गुळवे हिला क्रिडा शिक्षक दादासाहेव तुपे यांचे मार्गदर्शन मिळाले.ग्रामीण भागातून शिक्षणासोबतचं प्रवरेच्या माध्यमातून चांगले खेळाडू घडविण्यासाठी सर्व सुविधा दिल्याने प्रवरेचे खेळाडू आज अव्वल स्थानावर आहेत.
या विजयी खेळाडूचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे,शिक्षण संचालक डाॅ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, शिक्षण समन्वयक नंदकिशोर दळे,क्रिडा संचालक डॉ. प्रमोद विखे तसेच स्कूल कमिटी उपाध्यक्ष व सदस्य, प्राचार्य डॉ. राजेंद्र कोवरणे, सर्व सेवकवृंद, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.




