आश्वी दि.१३( जनता आवाज वृत्तसेवा ):-आज मानवाने विविध क्षेत्रात प्रगती केली. ही प्रगती करत असताना तंत्रज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आज हजारो मैल असलेली गोष्ट मानव घरबसल्या पाहू लागला मिळवू लागला, माहितीची अनेक दारे खुली झाली. ज्ञानाची भूक वाढीस लागली. तंत्रज्ञानामुळे सर्वांगाने मानवी जीवन सुकर झाले. असे प्रतिपादन प्रा. संतोष गुजर केले. लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय, आश्वी खुर्द मध्ये आयोजित महिला सबलीकरण मंचच्या उद्घाटन प्रसंगी केले. प्रा.गुजर बोलत होते.यावेळी महाविद्यालयाचे कॅम्पस संचालक डॉ. महेश खर्डे प्राचार्य देविदास दाभाडे, महिला सबलीकरण मंचच्या चेअरमन डॉ. सारिका थेटे होत्या.
पुढे बोलतांना प्रा. गुजर म्हणाले की, जसे तंत्रज्ञान माणसाच्या फायद्याचे ठरले तसे ते घातकही ठरले आहे. आज सायबर गुन्हे वाढत आहे. यामध्ये गुन्हेगार सापडतीलच असे नाही. तंत्रज्ञानाचा वापर करताना खूप खबरदारी घेणे गरजेचे आहे. मोबाईलचा विचार केला तर विविध अॅप्ससाठी आणि मोबाईल साठी ज्या सेक्युरिटीज असतात त्याचे पालन आजच्या महिलांनी करायला हवे. त्याचबरोबर खाजगी गोष्टी सोशलमिडीयावर टाकल्याने आपली फसवणूक होऊ शकते आणि त्यातून काही गुन्हे घडू शकतात यासाठी त्यांनी सायबर क्राईम विषयी सखेल माहिती उपस्थित विद्यार्थीनीना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी आहेर यांनी केले. प्रा. प्राजक्ता खळदकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थिनी व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली.




