राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक तहसील कार्यालय, राहुरी येथे अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत सुमारे ७८ लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आली.
समिती समोर एकूण १०० दाखल असलेले प्रकरणे मंजुरी साठी ठेवण्यात आली होती. यापैकी संजय गांधी योजनेचे ६४, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे १४ असे एकूण ७८ प्रकरणे मंजूर करण्यात आली. तर १८ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. यातील पात्र लाभार्थ्यांना पुढील महिन्यापासून लाभ मिळणार आहे. यावेळी तहसीलदार चंद्रजीत राजपूत, नायब तहसीलदार संध्या दळवी, पूनम दंडिले, संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार सचिन औटी, समितीचे सदस्य सर्जेराव घाडगे, नारायण धनवट, दीपक वाबळे, गोरख अडसुरे, अविनाश बाचकर, किरण ससाणे, अजित डावखर, उत्तमराव खुळे आदींसह संजय गांधी निराधार योजना शाखेचे अव्वल कारकून संजय वाघ, नंदा मकासरे, आय.टी. मंगेश साठे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे, खा. डॉ. सुजय विखे, जिल्हा बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे कामकाज योग्य प्रकारे सुरू असून तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी समितीचे सर्व सदस्य प्रयत्न करत आहे. असे अध्यक्ष विनित धसाळ यांनी सांगितले आहे.




