पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा ):- पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय पारनेर येथे माननीय आयुक्त पशुसंवर्धन अहमदनगर व सदस्य राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली एकदिवसीय कुक्कुट शाळा संपन्न.
शनिवार दि. १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वा. माननीय डॉ. सुनिल तुंबारे साहेब, आयुक्त पशुसंवर्धन विभाग, अहमदनगर आणि राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती सदस्य श्री धनंजय आहेर, श्री एकनाथ मुंगसे, श्री सुदर्शन पोकळे व पोल्ट्री फार्मर्स संघटना पारनेर तालुका अध्यक्ष श्री सर्जेराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, पारनेर, (अहमदनगर) येथे कुक्कटपालन व्यवसायासाठी शासनाच्या विविध योजनांबाबद कार्यशाळा व पोल्ट्री व्यवसायाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी कुक्कुट शाळेचे आयोजन करण्यात आले
पोल्ट्रीधारकांसाठी शासनामार्फत सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी शासनामार्फत पोल्ट्रीधारकांची संख्या व त्यांचा तपशील यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, शासनाच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यासाठी सर्व पोल्ट्री शेडची माहिती संकलित करण्याचे आव्हान सर्व पोल्ट्री धारकांना केले.
पोल्ट्री धारकांनी आपल्या फार्मची नोंद जवळच्या पशू वैद्यकीय दवाखाना, पंचायत समिती किंवा जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात त्वरित करून घ्यावी इथून पुढे कुठल्याही लाभ घेण्यासाठी ही नोंद आवश्यक असणार आहे.
तसेच उपस्थित पोल्ट्री व्यासायिकांच्या प्रश्नांचे निराकरण केले.तरी पशुसंवर्धन विभागा अंतर्गत होणाऱ्या तालुकास्तरीय कुक्कुट शाळा कार्यक्रमासाठी व आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी तालुक्यातील सर्व पोल्ट्री धारकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मा आयुक्त पशुसंवर्धन आणि राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती सदस्यांच्या वतीने करण्यात आले.



