spot_img
spot_img

प्रवरेच्या क्रिडा महोत्सवातील व्हॉलीबॉल स्पर्धेला मोठा प्रतिसाद

कोल्हार दि.१४( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कोल्हार यांचे संयुक्त विद्यमाने प्रवरा सामाजिक व क्रीडा महोत्सव अंतर्गत व्हॉलीबॉल मुले व मुली स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य संभाजी पाटील देवकर प्रमुख म्हणून उपस्थित होते.यावेळी शिक्षण समन्वयक प्रा. नंदकुमार दळे, क्रिडा संचालक डाॅ. प्रमोद विखे व स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सदर महोत्सवाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले गेले. सदर महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमाचा सुद्धा आयोजन गणपती काळामध्ये केले होते. सदर स्पर्धेमध्ये संस्था अंतर्गत तसेच संस्था बाह्य शाळांनी व महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला. मुले व मुली यांच्या एकूण ७० संघांनी ८५० खेळाडूंनी सदर स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केल्या. या स्पर्धेमध्ये मुलांचे तीन गट केले होते माध्यमिक गट, उच्च माध्यमिक गट व वरिष्ठ महाविद्यालय गट अशाप्रकारे स्पर्धांचे नियोजन केले होते. मुलींमध्ये माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक महात्मा फुले विद्यालय दाढ. द्वितीय क्रमांक खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालय गोगलगाव व तृतीय क्रमांक के. बी. व्ही.पी. आश्वी यांनी यश मिळवले. उच्च माध्यमिक मुली गटामध्ये प्रथम क्रमांक महात्मा फुले विद्यालय दाढ. द्वितीय क्रमांक प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी व तृतीय क्रमांक के. बी. पी. विद्यालय आश्वी यांनी यश संपादन केले. वरिष्ठ महाविद्यालय मुली गटामध्ये प्रथम क्रमांक कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कोल्हार, द्वितीय क्रमांक पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय लोणी व तृतीय क्रमांक कृषी महाविद्यालय लोणी यांनी यश संपादन केले.

त्याचबरोबर मुलांमध्ये माध्यमिक गट प्रथम क्रमांक पद्मश्री विखे पाटील सैनिक स्कूल लोणी, द्वितीय क्रमांक खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालय आश्वी व तृतीय क्रमांक खासदार बाळासाहेब विखे पाटील विद्यालय गोगलगाव यांनी यश संपादन केले.

उच्च माध्यमिक गट मुले महात्मा फुले .उच्च माध्यमिक विद्यालय दाढ, द्वितीय क्रमांक पद्मश्री विखे पाटील सैनिक स्कूल लोणी व तृतीय क्रमांक पद्मश्री विखे पाटील जुनिअर कॉलेज लोणी यांनी यश संपादन केले.

महाविद्यालयीन गटामध्ये प्रथम क्रमांक नर्सिंग कॉलेज लोणी, द्वितीय क्रमांक कला विज्ञान संगणक शास्त्र महाविद्यालय आश्वी तसेच तृतीय क्रमांक कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कोल्हार यांनी यश संपादन केले. सदर स्पर्धा आयोजनासाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक राहुल उबाळे यांनी परिश्रम घेतले सदर स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.हरीभाऊ आहेर यांचे मार्गदर्शनाखाली पार पडल्या बरोबर पंच म्हणून ग्रामीण शिक्षण संस्थेतील सर्व क्रीडाशिक्षक तसेच क्रीडा संचालक यांनी प्रा. सुनील चोळके यांचे मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!