spot_img
spot_img

उत्तम आरोग्यासाठी आहार महत्वपूर्ण    – डाॅ शशीकांत काळे विखे पाटील महाविद्यालयात आयुर्वेद जनजागृती कार्यशाळा

लोणी दि.१४( जनता आवाज वृत्तसेवा ):-आयुर्वेद ही निसर्गाने दिलेली मोठी देणगी आहे. उत्तम आरोग्यासाठी आहार महत्वपूर्ण असून चांगला आहार घ्या निरोगी रहा असा संदेश आयुर्वेद तज्ञ डॉ. शशीकांत काळे यांनी दिला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आयुष मंत्रालय भारत सरकार आणि लोणीच्या पद्यश्री विखे पाटील महाविद्यालयात आयोजित आयुर्वेद दिन आणि औषधी वनस्पती जनजागृती कार्यशाळेत डॉ. काळे बोलत होते यावेळी डॉ. मृणालिनी काळे, लोणीच्या माजी सरपंच सौ. मनिषा आहेर संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, डॉ. आर. ए. पवार, डॉ. महेश खर्डे, जनसेवा फौडेशनच्या प्रकल्प संचालिका सौ. रूपाली लोंढे, महाविद्यालयाचे हर्बल प्रकल्पाचे समन्वयक डॉ. अनिल वाबळे, डॉ. भाऊसाहेब रणपिसे, डॉ. छाया गलांडे, डॉ संजय गिरी आदीसह महीला बचत गटाच्या महीला उपस्थित होत्या.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. काळे म्हणाले,निरोगी आहार निरोगी जीवन ही आजची गरज आहे.चुकीच्या आहारामुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. भारतीय संस्कृतीत आयुर्वेद, विविध फळे, पालेभाज्या कंदभाज्या यांचे विशेष महत्व आहे असे सांगत काय खावे काय खावू नये यांवर मार्गदर्शन करतांनाच आयुर्वेदाचे महत्व समजून घेत सेंद्रीय आणि निसर्गातील विविध वनस्पती समजून घेत आहार आणि आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले.

डॉ. प्रदिप दिघे यांनी ही कार्यशाळा आयुर्वेदाविषयी जनजागृतीसाठी महत्वपूर्ण ठरले असे सांगून येणाऱ्या काळात संस्थेच्या माध्यमातून २५ शाळामध्ये हर्बल गार्डन ची उभारणी होणार असून आयुर्वेदाचे महत्व सांगितले. यावेळी डॉ मृणालिनी काळे यांनी विविध औषधी वनस्पती आणि त्याचा उपयोग यांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.आर. ए. पवार करतांना कार्यशाळेचा हेतू विशद केला. सुत्रसंचालन डाॅ.वैशाली मुरादे आणि प्रा.हर्षदा खर्डे यांनी तर आभार डॉ अमोल विखे यांनी मानले.

निरोगी आरोग्यासाठी निरोगी आहारासोबत विविध औषधी वनस्पतीचे वितरण यावेळी महिलांना करत असतांनाच आयुर्वेदांच्या जनजागृतीसाठी ही कार्यशाळा महत्वपुर्ण ठरली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!