मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा ):- अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नऊ मंत्री यांची शपथविधी होऊन दहा ते बारा दिवस होऊन गेले आहेत. परंतु अजून मंत्रिमंडळाची खाती वाटप झालेली नव्हती. आज खाती वाटपाचा मुद्दा हा निकालीच निघाला आहे. आज संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव थोड्यावेळापूर्वी खाते वाटपाची यादी घेऊन राज्यभावनावर पोहोचले आहेत. या यादीवर राज्यपाल रमेश बेस यांची स्वाक्षरीकरताच खातेवाटप हे जाहीर करण्यात येईल. राजभावनामध्ये खातेवाटप यादी पोहोचण्याचा वृत्तास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, आज संध्याकाळपर्यंत खाते वाटप जाहीर होईल. त्यांना विचारणा करण्यात आली की, कोणाला कोणते खाते दिले यावर अजित पवारांनी सांगण्यास स्पष्ट नकार दिला.



