spot_img
spot_img

प्रवराच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रुबीकॉन कंपनीकडून विशेष प्रशिक्षण 

लोणी दि.१५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकरीता नुकतेच सॉफ्ट स्किल्स च्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षण रुबीकॉन या कंपनीच्या प्रशिक्षकांकडून देण्यात आले. 

कृषी महाविद्यालय, कृषि व्यवयास व्यवस्थापन आणि कृषि जैव तंञज्ञान या तीनही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयांच्या वतीने दरवर्षी या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. त्या अंतर्गत व्यक्तिमत्व विकास, मुलाखत कौशल्य, ध्येय निश्चिती, संभाषण कौशल्य आदी विषयांवर तज्ञ प्रशिक्षकांकडून विद्यार्थ्यांना उत्तम प्रशिक्षण दिले जाते. केवळ पुस्तकी शिक्षण म्हणजे सर्व काही नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हायला हवा या दृष्टीने या संस्थेसोबत सामंजस्य करार केला असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे यांनी दिली. सदर प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यानंतर आपल्याला अनेक कौशल्य अवगत झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी यावेळी दिली. सदर चार दिवशीय प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रा. भाऊसाहेब घोरपडे, प्रा. सुदाम वर्पे, प्रा. सत्यम खर्डे यांनी विशेष मेहनत घेतली.

सदर प्रशिक्षणाच्या लाभार्थी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, संस्थेच्या संचालिका डॉ शुभांगी साळोखे, ऍग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट कॉलेजचे प्राचार्य डॉ अनिल बेंद्रे, ॲग्रीकल्चरल बायोटेक कॉलेजचे प्राचार्य डॉ.विशाल केदारी यांनी अभिनंदन केले आणि शैक्षणिक कारकिर्दी करिता शुभेच्छा दिल्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!