लोणी दि.१५( जनता आवाज वृत्तसेवा ):-हिंदसेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालय ,अहमदनगर आयोजित राज्यस्तरीय ज्ञानेश्वर करंडक मराठी वादविवाद स्पर्धेत प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लोणी ची इयत्ता बारावीची विद्यार्थिनी कु. शब्दाली विजय वाबळे हिने ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अतिवापरामुळे नैसर्गिक बुद्धिमत्ता धोक्यात आली आहे’. या विषयाच्या बाजूने आपले मत अत्यंत प्रभावी शब्दात व्यक्त करून रोख रक्कमेसह प्रमाणपत्र असे वैयक्तिक पारितोषिक मिळविले आहे. अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्य सौ. रेखा रत्नपारखी यांनी दिली.
या यशस्वी विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील!सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी शिवानंद हिरेमठ संस्थेचे अतांत्रिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे तसेच शिक्षण संचालिका सौ लीलावती सरोदे, शिक्षण समन्वयक प्रा. नंदकुमार दळे , प्राचार्या सौ.रेखा रत्नपारखी , प्राथमिक विभाग पर्यवेक्षिका सौ.अर्चना घोगरे व शाळेचे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .विद्यार्थिनीला मराठी विषय शिक्षिका सौ. गायकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.



