spot_img
spot_img

रेल्वेच्या नोटीसीला उत्तर देऊ तसेच कायदेशीर लढाईही लढू,- आ. कानडे

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- रेल्वे प्रशासनाने बजावलेल्या नोटिसांमुळे व्यापारी व खासगी घरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात घर बचाव संघर्ष समितीने सुरु केलेल्या आंदोलनास सर्वतोपरी मदत करू, रेल्वेच्या नोटीसीला उत्तरही देऊ तसेच कायदेशीर लढाईही लढू, अशी ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली.

आ. कानडे कामानिमित्त दिल्ली येथे असल्याने ते समितीच्या आंदोलनास हजर राहू शकले नाही. मात्र त्यांनी दिल्ली येथील मंत्रालयात जाऊन यासंबंधीची माहिती घेतली. व त्यानंतर त्यांच्या यशोधन संपर्क कार्यालयात घर बचाव संघर्ष समिती पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख, समितीचे अध्यक्ष अशोक बागुल, कार्याध्यक्ष मुख्तार शहा, उपाध्यक्ष तौफिक शेख, सचिव रियाज पठाण, अनिल इंगळे, माजी नगरसेवक दीपक चव्हाण, कलीम कुरेशी, मिलिंदकुमार साळवे, नागेश सावंत, तिलक डुंगरवाल, रज्जाक पठाण यावेळी उपस्थित होते.

आ. कानडे म्हणाले, गरीब, भूमिहीन, बेघरांनी अतिक्रमण करून घरे केली असली तरी,ती अनेक वर्षांपासून तेथे राहत आहेत. शासनाने २०११ पासूनची सरकारी जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे आदेश दिले आहेत. कायदा आपल्या बाजूने आहे. त्यामुळे घाबरुन जायचे कारण नाही. यासाठी तांत्रिक लढाई पार पडावी लागेल, नोटीसींना स्वतंत्रपणे उत्तरे देऊ, तसेच प्रतिज्ञापत्र करून या निर्णयाच्या स्थगितीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करू, आपण सर्वांचा लोकप्रतिनिधी असल्याने लोकांची कामे करणे हे माझे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

नागरीकांना नोटीसा आल्यानंतर राजकारण विरहित समिती स्थापन झाली, त्यांनी पुढाकार घेत या विरोधात आंदोलन हाती घेतले. सर्व पक्षाच्या लोक प्रतीनिधींची भेट घेतली. आपणही या प्रश्नात लक्ष घालून कोणीही विस्थापित होऊ नये, याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन अंजुम शेख यांनी केले. रेल्वे प्रशासन योग्य भूमिका घेत नाही तोपर्यंत समितीचे आंदोलन सुरु राहील, असे अध्यक्ष बागुल यावेळी म्हणाले.

यावेळी मुक्तार शहा, रियाज पठाण, दीपक चव्हाण, तिलक डुंगरवाल, तौफीक शेख, नागेश सावंत, मिलिंदकुमार साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. रज्जाक पठाण यांनी आभार मानले. यावेळी अकबर शाह,राजेंद्र भोसले, सलीमखान पठाण, नजीर शेख, साजिद शेख, अजय बनसोडे, रहेमानअली शाह यांच्यासह समितीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!