मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रीन प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.
अंमलबजावणी संचालनालय ( ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे. फरारी गँगस्टर दाऊद इब्राहिम व त्यांच्या साथीदारांमधील कथित संबंधाचा प्रकरणात ईडी फेब्रुवारी 2022 मध्ये नवाब मलिक यांना अटक केली होती. नवा मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



