spot_img
spot_img

संजीवनी फार्मसी महाविद्यालयाचे २३ विध्यार्थी जीपीएटी मध्ये पात्र – श्री अमित कोल्हे रोहित निवदुंगेने मिळविला देशात १४३ वा क्रमांक

कोपरगांव( जनता आवाज
 वृत्तसेवा ):-नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत २२ मे २०२३ रोजी घेण्यात आलेल्या देश पातळीवरील जीपीएटी या एम. फार्मसी प्रवेश पात्रता परीक्षेत संजीवनीचे तब्बल 23 विध्यार्थी पात्र झाले असुन रोहित निवदुंगे याने आपल्या प्रतिभा संपन्नतेच्या जोरावर देशात १४३ वा व अक्षय काळे २७९ वा क्रमांक मिळवुन संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला आहे, २३ इतक्या मोठ्या संख्येने विध्यार्थी पदव्युत्तर फार्मसी अभ्यासक्रमासाठी पात्र झाल्याने संजीवनीची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
           

पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की ग्रॅज्युएट फार्मसी अप्टिट्यूड टेस्ट (जीपीएटी) ही देशातील नामांकित फार्मसी महाविद्यालयांमध्ये एम. फार्मसी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येते. या परीक्षेत पात्र झालेल्या विध्यार्थ्यांना शिक्षणा दरम्यान प्रत्येकी रू १२,४०० प्रति महिना प्रमाणे २४ महिन्यांच्या कालावधीसाठी एकुण रू २,९७,६०० इतके स्टायपेंड मिळते. हे सर्व विध्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी पदव्युत्तर प्रवेशासाठी पात्र असणार आहे. २२ मे २०२३ रोजी घेण्यात आलेल्या देश पातळीवरील परीक्षेत एकुण ५५,५०८ बी. फार्मसीच्या अंतिम वर्षातील विध्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. दरवर्षी हा निकाल १० ते १५ टक्यांच्या दरम्यान असतो. अशा अवघड परीक्षेमध्ये त्यात एकट्या संजीवनीच्या २३ विध्यार्थ्यांचा समावेश आहे, ही मोठी उपलब्धी आहे. यात वरील दोन विध्यार्थ्यांव्यतिरीक्त महेश रावुत, मयुर गाढे, रामेश्वर पवार, सुजित भवर, कुशल राठोड, अनुराधा हरगुडें, संदेश कराळे, अभिषेक वायकोस, आरती धुस, श्रुती वाणी, वैभव मात्रे, अपूर्वा शिंदे ,संजय उपाध्याये, तेजस रंगभल, प्रियंका वाबळे, नुणम बोर्डे, अथर्व पानगव्हाणे, साक्षी गाढवे, आदिती खालकर, आदित्य बारसे व हरीओम प्रसाद यांचा समावेश आहे.  
        
देश व राज्य पातळीवरील वेगवेगळ्या स्पर्धा व प्रवेश परीक्षांसाठी संजीवनी फार्मसी महाविद्यालयामध्ये सातत्याने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात येते. यामुळे संजीवनीचे विध्यार्थी मोठ्या संख्येने यशस्वी विध्यार्थ्यांच्या यादीत सामाविष्ट असतात, असे श्री कोल्हे यांनी शेवटी सांगीतले.
        
 देश पातळीवरील या यशाबध्दल आणि ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी सुमारे रू ३ लाखांची मदत मिळणार असल्याने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विध्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे, प्राचार्य डॉ. विपुल पटेल, समन्वयक ए. एस. विष्णू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!