टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर तालूक्यातील भोकर येथील दिव्य दया चंद स्कूलच्या सहा विद्यार्थ्यांनी तालूका स्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.
श्रीरामपूर येथील आर बी एन बी कॉलेज येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत या सहा विद्यार्थी खेळाडूंनी अलौकीक कामगिरी दाखविल्याने या खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत निवड झाली आहे.
या स्पर्धेत लांब उडी खेळात १७ वयोगटात मुलींमध्ये कु. साक्षी संतोष खंडागळे हीने प्रथम क्रमांक मिळविला तर १४ वयोगटात कु. पूर्वा आबासाहेब गवारे हीने द्वितीय क्रमांक मिळविला असून १४ वयोगटात मुलांमध्ये आदित्य नंदकिशोर राऊत याने प्रथम क्रमांक तर सार्थक लक्ष्मण वाकडे याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
उंच उडी खेळात १७ वयोगटात मुलांमध्ये अथर्व नारायण पवार याने प्रथम क्रमांक मिळविला तर अक्षय एकनाथ नांदे याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. १४ वयोगटात मुलांमध्ये सार्थक लक्ष्मण वाकडे याने प्रथम क्रमांक मिळवाला आहे.
१४ वयोगटात मुलींमध्ये कु. विद्या अर्जुन थोरात हीने तृतीय क्रमांक मिळविला आहे. १७ वयोगटात ११० मीटर अडथळा शर्यतमध्ये ओमकुमार भाऊसाहेब पवार याने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
या सर्व खेळाडूंच्या घवघवीत यशा बद्दल दिव्य दया चंद स्कुलच्या प्राचार्या सि. कार्मिना फर्नांडिस, उप. प्राचार्या सॅन्ड्रा फर्नांडीस व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या खेळाडूंना क्रिडा शिक्षक दिपक दुधाळे यांचे मार्गदर्शन लाभले.



