spot_img
spot_img

जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर यांनी शासन आपल्या दरबारी ही योजना श्रीरामपुर येथे घेण्यात यावे -उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शना खाली जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर यांनी शासन आपल्या दरबारी ही योजना श्रीरामपुर येथे घेण्यात यावे अशी मागणी उद्योग मंत्री उदय सामंत साहेब याच्याकडे केली यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे व आमदार संजय शिरसाठ, आमदार भरतशेठ गोगवले हे उपस्थित होते.

यावेळी ना उद्य सामंत साहेब यानी आपली मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समोर माडून शासन आपल्या दारी योजनेचा कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले.
 तसेच मंत्रालयात येथे उद्योग मंत्री ना उदयजी सावंत व शिवसेना सचिव मान संजयजी मोरे यांच्याशी श्रीरामपूर एमआयडीसी  संदर्भात व उत्तर नगर जिल्ह्य़ातील संघटनात्मक बांधणी ची सविस्तर चर्चा झाली.. नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले आहेत.
सर्वसामान्य नागरिकांना अशा योजनांची माहिती देखील नसते. अश्या नागरिकांना या अभियानाअंतर्गत शासकीय योजना लाभू शकेल.
राज्यातील सर्वसामान्य तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी किंवा अर्जासाठी इतर कागदपत्रे आणि दाखले मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागायचे. या सर्व गोष्टीतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारतर्फे ‘ शासन आपल्या दारी ‘ हा उपक्रम राबविला जात आहे.
या अभियानाअंतर्गत नागरिकांना एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे आणि त्यासाठी आवश्यक विविध कागदपत्रांची पूर्तता देखील करून दिली जात आहे.
जिल्ह्यात सुमारे 5 हजार 457 कोटी निधीच्या वस्तूंचे वाटप या अभियानाद्वारे करण्यात येणार आहे.
या शासन अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या थेट दारी येणार आहे.शासन आपल्या दारी हि योजना श्रीरामपुर येथे आयोजित करण्यासाठी जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर यांच्या सह जिल्हा प्रमुख कमलाकर कोते ,युवासेना तालुका प्रमुख संदिप दातीर,उमेश पवार, सोमनाथ कानकाटे,सागर बोठे,सदाशिवराव गोदकर,बाबासाहेब कागुणे,आदिसह संगमनेर,राहता नेवासा,राहुरी येथील पदाधिकारी उपस्थित होते
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!