spot_img
spot_img

नवरात्रोत्सव कार्यक्रमांना रात्री बारापर्यंतच्या परवानगीस जिल्हाधिकारी सकारात्मक

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- रात्री बारा वाजेपर्यंत नवरात्रोत्सव कार्यक्रमास प्रशासकीय परवानगी मिळावी म्हणून वीर सावरकर प्रतिष्ठानने केलेल्या मागणीस जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहविभागाचे उपजिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून तातडीने अभिप्राय मागवला आहे.

वीर सावरकर प्रतिष्टानचे संस्थापक अध्यक्ष अमित मुथा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या मागणीत म्हंटले आहे की, हिंदू धर्मियांच्या पवित्र नवरात्रोत्सवास जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात सुरुवात झाली असून महिलावर्ग मोठ्या उत्साही वातावरणात या धार्मिक कार्यात सहभागी होत असतात.नवरात्रोत्सव निमित्ताने जिल्ह्यात खेड्यापाड्यासह मोठ्या शहरातही अनेक धार्मिक कार्यक्रम हे रात्रीच होत असतात गरबा नृत्य,भोंडल्याचे कार्यक्रमाबरोबरच देवी गितांचे कार्यक्रम ही रात्रीच साजरे केले जात असल्याने.रात्री दहा वाजेपर्यंतची प्रशासकीय वेळ ही अपुरी पडत असल्याने दहाची वेळ या धार्मिक कार्यांत अडथळा ठरत आहे.त्यामुळे महिलावर्गांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली जाणवत आहे.

देवीचे कार्यक्रम हे नऊ दिवस रात्रीच मोठ्या उत्साही वातावरणात साजरे केले जात असल्याने,सर्वच नवरात्रोत्सव मंडळांनी कुठेही अनुचित प्रकार घडणार याची जबाबदारी घेतली असल्याने पोलीस प्रशासनावरील ताण मोठयाप्रमाणात कमी होणार आहे.रात्री बारा वाजेपर्यंत वेळ वाढवण्यात यावा अशी मागणी वीर सावरकर प्रतिष्ठान बरोबर इतरही मंडळांनी केली आहे.यावर योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!