- टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथे विविध मंदिरात, घराघरात तसेच शारदा नवरात्र उत्सव मंडळांच्या वतीने घटस्थापना उत्साहात करण्यात आली.
येथील तुळजा भवानी मंदिरात पत्रकार विजय देवळालकर व वैशाली देवळालकर, मंदिराचे पुजारी गणेश जाधव व वैशाली जाधव व नरेश दुल्लम व अर्चना दुल्लम यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
टाकळीभान येथील विविध मंडळांनी आणलेल्या ज्योतीचे पूजन करून स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी ज्योतीचे दर्शन घेतले. विविध मंडळांनी ढोलताशांच्या गजरात देवीची मूर्तीची मिरवणूक काढून मूर्तीची प्रतिष्ठापना व घटस्थापना केली. मिरवणूकीत सहभागी झालेल्या देवी भक्तांनी आई जगदंबेच्या नावाने जयघोष करत फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची मुक्त उधळन केली.
नवरात्र उत्सवा निमित्त घटस्थापनेचे विविध साहित्य खरेदी करण्यासाठी येथील बाजारपेठ फुलली होती. नागरिकांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. टाकळीभान व परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात घटस्थापना करण्यात आली.



