spot_img
spot_img

पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या आरोग्यविषयक वेबिनार मध्ये छत्रपतीच्या विद्यार्थ्यांचा देखील सहभाग

नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि वेगन आऊटरीच या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन वेबीनार हा संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या दिवशी घेण्यात आला असून नेप्ती येथील श्री छत्रपती अभियांत्रिकी विद्यालयामध्ये १७ ऑक्टोबर रोजी नियोजित केला गेला. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. अन्न, उपयुक्त वनस्पती आणि आरोग्य या विषयावर वेगण आऊटरीच च्या समन्वयक भट्टाचार्य मॅडम यांनी महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना या वेबीनारच्या माध्यमातून दिली. दुभती जनावरे आणि त्यांना दिली जाणारे अन्न, त्या अन्नामध्ये केली जाणारी भेसळ, त्यापासून मिळणारे दूध या सर्व गोष्टी माणसाच्या आरोग्यासाठी कितपत योग्य आहेत याविषयी सविस्तर माहिती त्यांनी दिली. पुढे बोलत असताना त्यांनी सध्याच्या युगात फास्टफुड वर अवलंबून असणारे अगदी लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फास्टफुडच्या अतिसेवनाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम अगदी सविस्तर पद्धतीने समजावून सांगितले. 

विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी राबवलेले असे ऑनलाइन उपक्रम स्तुत्य असून फक्त विद्यार्थ्यांनीच नव्हे तर सर्वांनीच फास्टफुड वर अवलंबून न राहता वेबीनार मध्ये सांगितलेल्या गोष्टीचा अवलंब करावा आणि आरोग्य अधिकाधिक निरोगी कसे राहील याची काळजी घ्यावी याविषयीची माहिती प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी विद्यार्थ्यांना वेबीनार नंतर झालेल्या माहिती सत्रामध्ये दिली. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. गिरीश पाटील आणि त्यांचे सहकारी प्रा. अक्षय देखणे, प्रा. अमेय कुलकर्णी, प्रा. टी. पी. धंगेकर यांनी केले. कार्यक्रमास सिव्हील विभागाचे प्रमुख प्रा. पी. जी. निकम, प्रथम वर्ष समन्वयक डॉ. एम. के. भोसले, ई अँड टी सी विभाग प्रमुख प्रा. एस. एम. वाळके, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही. जगताप, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. ए. बी. काळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. अक्षय देखणे यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!