लोणी दि.१२( जनता आवाज
वृत्तसेवा ):-फूड टेक्नॉलॉजी हा कुकिंग कोर्स नसून सायन्स, इंजिनीअरिंग व टेक्नॉलॉजी याचे सर्वोत्तम मिश्रण आहे. यामध्ये फूड इंजिनीअरिंग, फूड प्रोसेसिंग, फूड केमिस्ट्री, फूड मायक्रोबायोलॉजी, फूड पॅकेजिंग, फूड मार्केटिंग व न्यूट्रिशन हे यातील महत्त्वाचे अभ्यासक्रम आहेत. फूड इंजिनीअरिंगमध्ये केमिकल इंजिनीअरिंगचे हिट् ट्रान्स्फर, फ्लूईड मेकॅनिक्स, मेकॅनिकल ऑपरेशन असे जवळजवळसर्व महत्त्वाचे विषय घेतले जातात, तर फूड अँड व्हेजिटेबलप्रोसेसिंग, डेअरी प्रोसेसिंग, सिरिअल प्रोसेसिंग, मीट पोल ट्री अँड एग प्रोसेसिंग, ऑइल प्रोसेसिंग, चॉकलेट प्रोसेसिंग, बेकरी प्रोसेसिंग असे विविधविषय फूड प्रोसेसिंगमध्ये घेतले जातात.
फूड केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक फूडमधील कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स अशा विविधघटकांचे महत्त्व व प्रमाण, त्यांचे विविध रासायनिकअभिक्रियेतील स्थान याची माहिती दिली जाते. फूड मायक्रोबायोलॉजीमध्येफूड मायक्रोऑरगॅनिझम्सचा कसा उपयोग करता येईल, याची माहिती देण्यात येते.असे प्रतिपादन कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली. . बारावी नंतर चार वर्ष फूड टेक्नॉलॉजी शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याला बी. टेक फूड टेक्नॉलॉजी ही पदवी मिळू शकते.
त्यासाठी सर्वसाधारण उमेदवाराला फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, बायोलॉजी या विषयांमध्येकमीत कमी ५० टक्के तर आरक्षित वर्गासाठी किमान ४० टक्के गुण घेऊन बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. याशिवाय एम.एच टी सी ई टी, नीट, जेईई किंवा ए आय ईई ए यामधील प्रवेश पात्रता परीक्षादिलेली असावी. बीटेक हा चार वर्षांचा, तर एमटेक हा पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन वर्षांचा आहे. फूड टेक्नॉलॉजीमधील व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्णकेल्यानंतर फूड प्रोसेसिंग कंपन्या, फूड रिसर्च लॅबोरेटरीज, अन्नपदार्थाचे घाऊक व्यापारी, रिटेल उद्योग, हॉटेल, रेस्टॉरंट्स, हॉस्पिटल तसेच अन्यठिकाणच्या कॅटरिंग उद्योगांमध्ये चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.मोठ्या नामांकितकंपन्यांमध्ये फॅक्टरी मॅनेजर,सुपरवायझर, क्वालिटी कंट्रोलर, रिसर्चर म्हणून संधी मिळू शकते. याशिवाय सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्चइन्स्टिट्यूट,म्हैसूर, भाभा अॅटॉमिक रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई, डिफेन्स फूड रिसर्चलॅबोरेटरी म्हैसूर यांसारख्या केंद्रीय तसेच राज्यस्तरीय रिसर्चइन्स्टिट्यूटसमध्ये वैज्ञानिक म्हणून संधी मिळू शकते. याचबरोबर अन्न व औषध प्रशासन (फूड इन्स्पेक्टर, भारतीय खाद्य निगमयासारख्या सरकारी विभाग, केंद्र व राज्य सरकारच्या नवीन धोरणांमुळे स्वयंरोजगाराच्या, मॉल्स, हॉस्पिटल, हॉटेल्स, जिम्समध्ये क्वालिटीकंट्रोलर तसेच डाएटेशियन, वेगवेगळ्या शैक्षणिक तसेच प्रशिक्षण संस्थेमध्येशिक्षक वा प्रशिक्षक म्हणून संधी मिळू शकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संधी मिळू शकतात.
विद्यार्थी हा अभ्यासक्रम -पूर्ण झाल्यावर स्वत:चा व्यवसाय करू शकतो. तरुणांना व्यवसाय करत असताना शासनाकडून सबसिडी देखील मिळते. तसेच या अभ्यासक्रमा नंतर राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा विद्यार्थी देवू शकतात. व स्टाफ सिलेक्शन, बँक वविमा क्षेत्र, मंत्रालयीन अधिकारी, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, पंचायतसमिती, कृषी विभाग या ठिकाणी कृषी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी म्हणून संधी आहेत.
अन्नप्रक्रिया उद्योग दिवसेंदिवस वाढत असून या उद्योगामध्ये सुमारे14% जीडीपी भारताच्या एकूण अन्न निर्यातीच्या 13% प्रशिक्षित सेवकांचीमागणी आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेने खड्केवाके येथे सुरु केलेल्या फूड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या या अभ्यासक्रमास आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन देखील डॉ. साळोखे यांनी केले.



