लोणी दि.१७ ( जनता आवाज वृत्तसेवा):-चिंचोली येथील सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विवोसा लर्निंग संस्थेमार्फत एका आठवड्याचे ॲप्टीट्यूड प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.या प्रशिक्षणादरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
प्रशिक्षणाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश शिंदे यांनी केले तसेच प्रशिक्षणाचे महत्त्व व भविष्यामधील त्यांची उपयुक्तता त्यांचे सखोल माहिती दिली. एका आठवड्याच्या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षक आशिष तिवारी आणि आशिक जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना ॲप्टीट्यूड चे ट्रेनिंग दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. ऋषिकेश भालेराव, डॉ. दिपक चंद्रे, प्रा. शरद रोकडे, प्रा. सतीश चोळके, प्रा. प्रभा गडाख, प्रा. सोनाली बेनके, प्रा. शिलभद्र कदम, प्रा. मोहिनी वाजे यांनी विशेष परिश्रम घेतले.



