कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बु ता. राहाता जि. अहमदनगर या विद्यालयात नेहमी विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे मंगळवार दि १७/१०/२०२३ रोजी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष अड मा. श्री सुरेंद्र पा.खर्डे व विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री सुधीर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गणित-विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन स्थानिक सल्लागार समिती सदस्य मा. पांडुरंग पा. देवकर व मा. श्री अजित मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री.सुधीर वाघमारे , पर्यवेक्षिका मा. श्रीम. संजीवनी आंधळे, गुरुकुल प्रकल्प प्रमुख श्री. गुंजाळ बी.जी. विज्ञान प्रदर्शन प्रमुख श्री. भिंगारदे एस. बी. , विज्ञान शिक्षक श्री खंडागळे एस. बी. , श्रीमती पठाण एस.एस. , सौ कडू जे. डी. , श्रीमती लहामगे ए. एस. , श्री पवार एस.आर., श्री. नवाळे बी.जी. आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात इयत्ता पाचवी ते सातवी लहान गटामध्ये एकूण ११९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व इयत्ता आठवी ते दहावीच्या मोठ्या गटामध्ये एकूण ३७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला .
या प्रदर्शनाचे परीक्षण विज्ञान शिक्षक . भिंगारदे एस. बी.. व श्रीमती पठाण एस. एस. यांनी केले.
लहान गटात प्रथम क्रमांक इ. सातवी च्या
सोहम विजय शिंदे याच्या भूकंप मापक या उपकरणास
तर मोठया गटात इ.९ वी च्या
समर्थ धनंजय शिरसाठ याच्या Third eye for blind people
लोकेश विनोदकूमार गुगळे याच्या Transmission Line Fault Direction या उपकरणास विभागून मिळाला.



