spot_img
spot_img

सध्या सुरु असलेले राजकारण जनतेने समजून घ्यावे- आ. कानडे  

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – प्रशासन हा समजाचा कणा आहे. मात्र सध्या कंत्राटी पद्धतीने नोकर भरती सुरु आहे. सरकारी उधोग धनदांडग्यांना विकण्याचे काम भाजपा सरकार कडून सुरु आहे. आरक्षणावरून राजकारण होत आहे. विकास कामे होतच राहतील मात्र सध्या सुरु असलेले राजकरण आपण समजून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.

कॉंग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे आयोजित केलेल्या बैठकीत जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, सरपंच किशोरनाना बनकर, आण्णासाहेब बनकर व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी कोल्हार-बेलापूर -पढेगाव ते बेलपिंपळगाव आणि पढेगाव जुने गावठाण ते बोधेगाव पद्मावती मंदिर या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आ.कानडे तसेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले, केंद्र सरकार कडून विमानतळ, बंदरे, रेल्वे धनदांडग्यांना विकली जात आहे. आता शाळाही विकायला काढल्या आहेत. तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस, शिक्षक यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. एकीकडे सुशिक्षित तरुणवर्ग स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी खपत आहे. मैलो-मैल दौड करत आहे. कंत्राटी पद्धतीने पदे भरून सरकारला या तरुणाची स्वप्ने जाळून टाकायची आहेत. यामुळे राज्यघटनेने जो प्रशासकीय ढाचा दिला तो पडतो कि काय अशी शंका येत असल्याचे आ.कानडे म्हणाले.

महाआघाडी सरकार बदलल्यानंतर दीड वर्षापूर्वी मंजूर झालेल्या रस्त्यांना भाजपा सरकारने स्थगिती दिली. याबाबत दोन अधिवेशनामध्ये आवाज उठविण्यात आला. तरीही सरकारने दखल न घेतल्याने आपण न्यायालयात गेलो. इतर आमदारांनीही न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने सरकारला म्हणणे मांडण्यास सांगितल्यानंतर शासनाने स्थगिती उठविली. हि कामे आता होत आहेत. विधानमंडळात हि कामे मंजूर करून त्याची अंदाज पत्रकात तरतूद करण्यात आली. मंजूर झालेल्या कामांना स्थगिती देता येत नाही. नकारात्मक मानसिकता असलेल्या सरकारच्या हा निर्णय अंगलट आल्याची टीका आ. कानडे यांनी यावेळी केली.

सध्या व्यवस्था बेकार आहे, कोणाला कोणाचा तरी धाक, दडपण आहे. या दडपणाला कोणीही बळी पडू नये, कष्ट करणारा शेतकरी, माणूस स्वाभिमाने जगाला पाहिजे, ज्यांनी ज्यांनी राजकीय पक्ष स्थापन केले ते त्यावेळी विकासाचे गाणे गात होते मात्र आता या पक्षाच्या नेत्यांना पक्षपुटीने ग्रासले असल्याचे आ. कानडे म्हणाले.

यावेळी सरपंच किशोरनाना बनकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रमेश आढाव, अकबर शेख, एकनाथ बनकर, बबनराव बनकर, शशिकांत राजवाळ, सुभाष बनकर, शिवाजी लबडे, विकास बंगाळ आदींसह पढेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

 

…………

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!