spot_img
spot_img

मनसे पक्षाच्या एक सही संतापाची या मोहिमेस श्रीरामपूरकरांचा उदंड प्रतिसाद

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- मनसे पक्षाच्या एक सही संतापाची या मोहिम प्रसंगी श्रीरामपूरकरानी चांगला प्रतिसाद देऊन सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या विरोधात संताप व्यक्त केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यावर एक सही संतपाची  ही मोहीम राबविण्यात आली याच अनुषंगाने श्रीरामपूर गांधी पुतळा येथे बाबासाहेब शिंदे मनसे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मोठे बॅनर लावून एक सही संतापाची ही मोहीम राबविण्यात आली या या मोहिमेची सुरुवात दैनिक जय बाबा चे कार्यकारी संपादक मनोज भाऊ आगे व राष्ट्रीय सह्याद्री चे संपादक करण भाऊ नवले यांच्या सहीने या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी म्हणजे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही एक सही संतापची ही मोही संपूर्ण राजपूत राज्यभर राबवत आहोत सध्या राज्यात जे पक्ष सत्तेत आहेत तेच पक्ष विरोधी पक्षात देखील आहेत निवडणुकीच्या वेळेस एकमेकावर चिखल करणारे पक्षाचे नेते आमदार खासदार आज सत्तेसाठी सगळेजण शिकलात पडले आहे या लोकांना नागरिकांची मताची किंमत राहिली नाही व यांच्या पक्षाचे ध्येय धोरण विचार याचा सुद्धा विसर पडलेला आहे अशा लोकांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवावे व स्वाभिमानाने व विचारासी तडजोड न करणारे मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांना मतदार राजाने पाठिंबा देऊन मनसे या पक्षाला भरघोस मताने निवडून द्यावी अशी अहवाल या प्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे केले 
याप्रसंगी मनसे तालुकाध्यक्ष डॉक्टर संजय नवथर, शहराध्यक्ष सतीश कुदळे, विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष गणेश दिवसे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष नंदू चाबुकस्वार,शहराध्यक्ष कुणाल सूर्यवंशी,विलास पाटणी,भासकर सरोदे,अंबादास कोकाटे ,विकी राऊत,प्रवीण कारले,सुनील करपे,रामेश्वर कोल्हे, अतुल तारडे विशाल गायकवाड,निलेश सोनवणे,दर्शन शर्मा,संदीप विशंभर,राजू शिंदे ,सचिन कदम,राजू जगताप,ज्ञानेश्वर सोनार,मनोहर बागुल,बबलू बोरकर आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!