लोणी दि.१८ ( जनता आवाज वृत्तसेवा ):- जिल्हास्तरीय शालेय मैदानी रिले स्पर्धा अहमदनगर येथे नुकत्याच पार पडल्या, त्यामध्ये प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करीत – विद्यालयाच्या १३ मुलींची पुणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.अशी माहीती प्रवरा कन्या मंदिरच्या प्राचार्या सौ भारती कुमकर यांनी दिली.
१४ वर्ष मुली- २०० मीटर धावणे या स्पर्धेत -कु. कृतिका गिरी हिचा – प्रथम क्रमांक ४ ×१०० रिले स्पर्धेत आली.कु. कार्तिकी आमटे, कु. प्रतिक्षा भसाड , कु. ज्ञानेश्वरी वाळुंज, कु. ज्ञानेश्वरी रिंधे यांचा देखील त्यामध्ये समावेश होता. १७ वर्ष वयोगट मोठा – यामध्ये -४×१०० रिले प्रथम क्रमांक – कु. समृद्धी जंगले, कु. पुजा धायगुडे, कु. अंजली जाधव, कु. वैष्णवी मोरे कु. संस्कृती गायके यांचा समावेश होता. १०० मीटर- रिले धावणे स्पर्धेत कु. समृद्धी जंगले हिने प्रथम क्रमांक पटकवला.
२०० मीटर धावणे स्पर्धेत कु.जाधव अंजली हिने तृतीय क्रमांक पटकवला. ४०० मीटर धावणे स्पर्धेत – कु. पुजा धायकुटे हिने प्रथम क्रमांक पटकवला. तसेच जिल्हा स्तर बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेत कु मृणाल बोऱ्हाडे या विद्यार्थ्यीनीने दिमागदार कामगिरी करीत प्रथम क्रमांक प्राप्त करून सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरिता तिची निवड झाली. या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांनीना विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका विद्या गाढे , कल्पना कडू यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ सुजय विखे पाटील ,संस्थेचे सहसचिव भारत घोगरे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे , समन्वयक प्रा. नंदकुमार दळे,क्रिडा संचालक डाॅ.प्रमोद विखे, प्राचार्या सौ भारती कुमकर ,सौ सीमा बढे , पर्यवेक्षक बी पी चिंधे ,ज्येष्ठ शिक्षक प्रा.गिरीश सोनार , ज्युनिअर कॉलेजचे इन्चार्ज प्रा. नंदू कुदळे, सुचित्रा तांबे, अनिल लोखंडे ,मोहिनी गायके ,सुरेश गोडगे व सर्व शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यीनी व मार्गदर्शक शिक्षिकांचे अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



