spot_img
spot_img

श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेचे यश

माळवडगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजीत रंगोत्सव या कला महोत्सवात वडाळा महादेव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेने घवघवीत यश प्राप्त केले आहे.रंगभरणे,रेखाटन, हस्ताक्षर,यांसह विविध कला विभागात विद्यालयातील १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.यापैकी २८ विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश‌ मिळवले आहे.विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक,१० विद्यार्थ्यांना कांस्य पदक तर ०६ विद्यार्थ्यांना रौप्य पदक मिळाले असुन विद्यालयाला इंटरनॅशनल आयकॉन सन्मान,प्राचार्या सौ.भाग्यश्री आघाडे यांना तर लीडर ऑफ कल्चरल अक्टिव्हीटी सन्मान, कला शिक्षिका सौ.सविता कचरे मॅडम यांना तसेच कलाभुषण चषक तर इयत्ता ४ थी तील विद्यार्थीनी श्रुती सलालकर हिस आर्ट मेरीट अवार्ड देऊन सन्मानीत करण्यात आले.

या यशाबद्दल विद्यालयाच्या प्राचार्या भाग्यश्री आघाडे तसेच विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप कसार तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य देवा भाई चौधरी व सौ रचना दीदी फासाटे व संस्थेचे मार्गदर्शक शुभांगी दीदी करवीर आदिंनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व सह शिक्षकांचे अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!