नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- सौरऊर्जेचा वापर आजच्या काळात भारतातील गावे आणि शहरांमध्येही होऊ लागल्यामुळे सौरऊर्जेच्या सहाय्याने खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये वीजनिर्मिती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सौरऊर्जा आणि सौर पॅनेलच्या बाबतीतही भारतीयांना सरकारकडून भरपूर मदत मिळत आहे. सूर्याच्या किरणांचे रूपांतर पी.व्ही (फोटोव्होल्टेइक) तंत्रज्ञानाचा वापर करून विजेमध्ये कश्या पद्धतीने करता येते, याविषयी मुद्देसूद माहिती व्यख्यानास लाभलेले प्रमुख पाहुणे श्री विश्वनाथ दामोदर यांनी दिली. नेप्ती येथील छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागांतर्गत मेसा म्हणजेच मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन आणि मिटकॉन कन्सल्टन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले.
या व्याख्यानासाठी अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. मिटकॉन कन्सल्टन्सी तर्फे उपस्थित असलेले श्री नित्यानंद तिवारी आणि शुभदा ठिगळे मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना सोलर सेक्टर मध्ये व्यवसाय कश्या पद्धतीने सुरू करता येतो याविषयी माहिती सांगितली.
अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी हे सौर ऊर्जा संबंधित विविध प्रकल्प सादर करत असतात आणि भविष्यात इलेक्ट्रिक वाहने सुद्धा सौर ऊर्जेवर चार्ज करण्यात येतील, असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय आर खर्डे सर यांनी व्यक्त केले. या व्याख्यानाचे नियोजन मेकॅनिकल विभागातील प्रा. एस. आर. गोरे यांनी विभागप्रमुख प्रा. ए. बी. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. प्रा.मोहनेश मांढरे, प्रा. अक्षय देखणे आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली. कार्यक्रमास कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही. जगताप, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. ए. बी. काळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन द्वितीय वर्ष मेकॅनिकल ची विद्यार्थिनी अक्षदा ठानगे आणि आभारप्रदर्शन धनश्री शिंदे हिने केले.



