अस्तगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- अस्तगाव फाट्यावरील पेट्रोल पंपावर लावलेली टाटा कंपनीची १५ लाखाची मालवाहतुक गाडी चोरून नेण्याची घटना घडली आहे.
अस्तगाव फाट्यावरील पेट्रोल पंपावर लावलेली टाटा कंपनीची १५ लाखाची मालवाहतुक गाडी अज्ञात चोरांनी पळवली
सदर माहिती अशी आहे की, प्रभाकर सिताराम आढाव, रा. गणेशवाडी( शिर्डी ) यांच्या मालकीच्या टाटा कंपनीची एलपीटी – १५१२ मॉडेलची मालवाहतूक गाडी क्रमांक एम एच १५ एच एस २३९९ यावर सलीम कादर शेख ( वय ४१ रा. अस्तगाव) हा नित्यनेमाने अस्तगाव फाट्यावरील पेट्रोल पंपावर आपली गाडी लावत होता. नेहमीप्रमाणे तो काल आपली गाडी पंपावर पार्किंग करून रात्रीच्या वेळी घरी गेला होता. सकाळी ज्या वेळी तो आला तर गाडीचा पत्ता नव्हता. त्यानंतर तिने तिथे चौकशी केली असता कुठल्याही प्रकारचा गाडीचा सुगावा लागला नाही.
अस्तगाव फाट्यावर असलेला इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर आपण नेहमीप्रमाणे गाडी उभी करून केबिनचे दोन्ही दरवाजे लॉक करून मी गाडी पार्किंग केली होती. त्यानंतर मी घरी गेलो होतो असे ड्रायव्हरचे म्हणणे आहे.
त्यानंतर मी सायंकाळी पाच वाजता आपण गाडी लावलेल्या ठिकाणी पंपावर आलो. त्यावेळी मला तिथे गाडी दिसली नाही. सदर गाडी ही कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणाहून चोरून येण्याची लक्षात आल्यानंतर ड्रायव्हर सलीम शेख यांच्या फिर्यादीवरून राहता पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला आहे. राहता पोलिसांनी भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करून घेतला आहे. याप्रकरणी पुढील तपास राहाता पोलीस करीत आहे.



