कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रमा अंतर्गत अमृत कलश यात्रेच्या रथाचे आगमन श्री क्षेत्र कोल्हार भगवतीपुर येथे झाले. यावेळी रथाचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले.
सदर अमृत कलश यात्रेच्या रथाचे स्वागत कोल्हारच्या सरपंच सौ. निवेदिता बोरूडे , भगवतीपुरचे सरपंच दत्तात्रय राजभोज यांनी केले. अमृत कलश यात्रेच्या रथाची फेरी मारून यावेळी ग्रामपंचायत कार्यालयसमोर पंचप्रण शपथ घेण्यात आली. ही यात्रा गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांचे नियोजनातून संपन्न झाली. रथयात्रेसमवेत विस्तार अधिकारी एस. बी. गायकवाड होते.
यावेळी बालविकास अधिकारी श्रीमती नागरे, गोरख खर्डे, कोल्हारचे ग्रामविकास अधिकारी शशिकांत चौरे, भगवतीपूरचे ग्रामविकास अधिकारी श्रीराम कोते, मराठी शाळा, उर्दू शाळा, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, महिला ग्रामसंघ प्रतिनिधी ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी याप्रसंगी स्वागतास उपस्थीत होते.



