spot_img
spot_img

येवला तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज,व.भव्य धरणे ठिय्या आंदोलन समिती, यांच्यावतीने अन्नत्याग आंदोलन सुरू

येवला (जनता आवाज वृत्तसेवा):- संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण त्वरित मिळावे या जाहीर प्रमुख मागणीसाठी, येवला तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज भव्य ठिय्या धरणे आंदोलन समिती, येवला शहर व. तालुका, यांच्यावतीने अन्नत्याग आंदोलन चालू झाले आहे,

गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रलंबित जाहीर प्रमुख मागण्यांसाठी भव्य ठिय्या आंदोलन समिती, यांच्या वतीने, राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठिय्या आंदोलन चालू आहे, त्याचबरोबर शासनाकडे निवेदन दिलेल्या सर्व जाहीर प्रमुख मागण्या , नुसार शासनाने सर्व मागण्या त्वरित मंजूर कराव्यात, याकरिता भव्य अन्न त्याग आंदोलनाला सुरुवात झालेली आहे.

या आंदोलनाची कोणत्याही प्रकारे दखल घेतली नाही म्हणून यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या कामकाजावर, तीर्व नाराजी व्यक्त केलेली आहे, आणि म्हणून भव्य अन्न त्याग आंदोलनाची सुरुवात करण्यात आली, मागील गेल्या दि. 18 सप्टेंबर पासून म्हणजे जवळपास एक महिन्यापासून येवला शहरातील तहसील कार्यालया समोर, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला जाहीर पाठिंबा म्हणून येवला शहर व तालुका सकल मराठा समाज यांच्यावतीने भव्य ठिय्या आंदोलन तसेच, आता अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे,

या आंदोलनास संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी देखील भेट दिली आहे, सदर संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच येवला तालुक्यातील काही स्थानिक जाहीर प्रमुख मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित, पडलेले आहेत, सर्व जनतेचा मुख्य पाट पाण्याचा, प्रश्न, पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा, 1972, पासून आज पर्यंत झालेला नाही, तसेच राजापूर ता. येवला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास, रीतसर परवानगी मिळावी आंदोलनकर्त्यांवरील दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे, तसेच येवला तालुक्यातील रास्ते सुरेगाव येथे पाटाचे पाणी मिळविण्यासाठी, जे. आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते सर्वच गुन्हे देखील शासनाने त्वरित मागे घेण्यात यावे आदि सह विविध सर्व प्रमुख, रास्त मागण्या शासनाने तातडीने मार्गी लावण्यासाठी , भव्य अन्य त्याग, आंदोलन सुरू करण्यात आले आहेत अन्न त्याग आंदोलनाला सकल मराठा समाज व ठिय्या आंदोलन समिती चे, संजय पाटील सोमासे, निंबाजी फरताळे, विजय (पिंटू )मोरे, जालिंदर मेंढकर, गणेश पाटील सोमासे, गोरख संत, रवींद्र शेळके, विष्णू चव्हाण , संकेत शिंदे , संतोष गायकवाड, किरण कोल्हे, आदी सह समाज बांधव सामील झालेले आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!