नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा):-अहमदनगर येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापिका विजया अशोकराव कोळेकर या राज्यशास्त्र विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत 23 मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सेट परीक्षेत 300 पैकी 178 (59.33) मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाल्या.
त्या नेवासा येथील भारतीय जनता पक्षाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव कोळेकर यांच्या मुलगी असून सेट परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल तिच्यावर जिल्हाभरातून कौतुककांचा वर्षाव होत आहे.
यावेळी प्राध्यापिका विजया कोळेकर यांचे पती कृष्णा बिचकुले, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जे डी खानदेशे, सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे, डॉक्टर विवेक भापकर, विश्वस्त दीपलक्ष्मी म्हसे, सिताराम खिलारी ,मुकेश मुळे, जयंतराव वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्करराव झावरे, उपप्राचार्य डॉक्टर बाळासाहेब साबळे, विभागप्रमुख प्राजक्त ठुबे, बाळासाहेब पवार, प्राध्यापक रवींद्र जोगदंड, ज्योती भापकर, त्यांचे वडील अशोकराव कोळेकर या सर्वांनी विशेष अभिनंदन केले.



