शिर्डी ( जनता आवाज वृत्तसेवा):-शिर्डीतील अद्ययावत दर्शन रांगेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार असेल तर आणखी काही दिवस थांबू. पंतप्रधानांच्याहस्ते उद्घाटन होत असल्यामुळे संपूर्ण जगभरात अद्ययावत दर्शन रांगेची चर्चा होईल. त्यामुळे जगभरातील साई भक्तांना याबाबत माहिती मिळेल, अशी अपेक्षा माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी दिली आहे.
जगताप म्हणाले अद्ययावत दर्शन रांग तातडीने सुरू व्हावी ही प्रामाणिक इच्छा आहे. मात्र या दर्शन रांगेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाल्यास शिर्डीचे नाव संपूर्ण जगाच्या नकाशावर झळकेल. दर्शनरांगेच्या शुभारंभानिमित्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना शिर्डीत निमंत्रित करावे याकरिता आपण स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहोत. साईबाबा संस्थानच्यावतीने नव्याने उभारण्यात येणाऱ्या सव्वाशे कोटी रुपये खर्चाच्या अद्ययावत दर्शन रांगेचे काम पूर्ण झाले आहे.
मात्र सदर रांग इमारत उद्घाटनाअभावी साई भक्तांसाठी खुली करण्यात आली नाही. मागील काळात देखील दर्शन रांग साई भक्तांसाठी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी आपण केली होती. मात्र दर्शन रांगेच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असतील तर आणखी काही दिवस थांबून त्यांच्या हस्ते केले उद्घाटन तर शिर्डी अद्यावत दर्शन रांगेची चर्चा संपूर्ण देशात होणार असल्याने शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांना याबाबत तात्काळ माहिती होऊ शकेल.



