नाशिक( जनता आवाज
वृत्तसेवा ):- वणीचे सप्तशृंगी गडावरून खाली येत असताना एसटी  बस थेट 400 फूट दरीत कोसळून  भीषण अपघात झाला आहे. या बस मध्ये २३  प्रवासी होते. त्यापैकी  एकाच मृत्यू झाला असून जखमींना तात्काळ  शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. 
राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. एकीककडे समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला. तर दुसरीकडे आज दिनांक १२ जुलै रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास प्रवाशांसह बस दरीत कोसळली. 
अपघातग्रस्त बस ही खामगाव डेपोमधील असल्याची माहिती मिळाली आहे. एकाचा मृत्यू झाला आहे. तर २३ प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या बस अपघातामध्ये पंधरा ते वीस प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमी प्रवाशांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच मंत्री दादा भुसे घटनास्थळाकडे रवाना झाले. अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले. अपघाताची माहिती मिळताच मंत्री दादा भुसे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी व तेथील  तहसीलदार यांना फोन करत अपघाताची व तेथील परिस्थितीची माहिती घेतली. अपघातात जखमी झालेल्या प्रवासी यांना तात्काळ शासकीय मदतीची व्यवस्था करावी असे आदेश दिले . एसटी बस चा अपघात हा नेमकी कशामुळे झाला याचे अद्यापही कारण कळू शकले नाही.



