लोणी दि.१९ ( जनता आवाज वृत्तसेवा):-प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची संकल्पना ग्रामीण युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असून,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वकर्मा योजनेच्या यशस्वीतेसाठी कौशल्य विकास केंद्र उपयुक्त ठरतील असा विश्वास महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने ५०० कौशल्य विकास केंद्राची सुरूवात करण्यात आली.नगर जिल्ह्यातील १४ तालुक्यात २९ ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले आहैत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या केंद्राचे उद्घाटन केले.शिर्डी मतदार संघात लोणी आश्वी आणि पुणतांबा येथे या केंद्राची सुरूवात होत आहे.लोणी येथील केंद्राच्या उद्घाटनाच्या निमिताने प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमास प्राचार्य डॉ सजय गुलाणी, प्राचार्य व्ही आर राठी आयटीआयचे प्राचार्य अर्जून आहेर,शिर्डी लोकसभा मतदार संघाचे समन्वयक योगिराज परदेशी भाजयुमोचे ॠषिकेश खर्डे कौशल्य विकास अधिकारी रविकुमार पंतम मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.उद्घाटनाच्या निमिताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांशी संवाद साधला.
कौशल्य विकास केंद्राच्या संदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहीती देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,राज्यातील राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती मध्ये आशा पध्दतीची कौशल्य विकास केंद्र नव्हती.मात्र कौशल्य विकास हा पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यांच्या संकल्पनेतून राज्यात या केंद्राची होत असलेली सुरूवात ग्रामीण भागातील युवकांच्या रोजगाराच्या संधीसाठी महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज रोजगारासाठी ग्रामीण भागातून युवकांचे होत असलेले स्थलांतर थांबविण्यासाठी कौशल्य केंद्राची संकल्पना महत्वाची असून या केंद्रातून युवकांना विविध क्षेत्रातील कामाचे ट्रेनिंग आणि रोजगाराचे मार्गदर्शन मिळू शकणार असल्याचे नमूद करून या माध्यमातून ग्रामीण कारगिरांच्या कौशल्याला नव्या संधी मिळतील.
पंतप्रधान मोदी यांनी विश्वकर्मा योजनेतून पारंपारीक व्यावसाय कारगीर यांना संधी देण्यासाठी निर्णय घेतला आहे.या योजनेला कौशल्य विकास केंद्राची जोड मिळणार असल्याने ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्याच्या प्रयत्नांना गती मिळणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.



