spot_img
spot_img

म्हैसगांवत तिसरा पॅनल निवडणूक लढवणार ; गावातील दोन्ही पॅनलवर ग्रामस्थ नाराज ?

म्हैसगांव( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहुरी तालुक्यातील म्हैसगांव या गावच्या दोन्ही पॅनल वर गावचे ग्रामस्थ नाराज झाले आहे या दोन्ही पॅनलच्या विरुद्ध नव्याने तिसरा पॅनल उभा करण्याची गावाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे या साठी गावची होतकरू मुलाची तयारी ही सुरू झाली आहे.

या अगोदर म्हैसगांव मध्ये दोन पॅनल निवडणुक लढवीत होते परंतु दोन्हीही पॅनल मध्ये फोठ पडून यावर्षी या दोन पॅनल च्या विरोधात नव्याने तिसरा पॅनल निवडणूक लढवणार आहे .त्याची तयारी ही सुरू झाली असल्यासारखी चित्र स्पष्ट दिसते आहे हा पॅनल रिंगणामध्ये उतरणार असल्याची व त्याची तयारी चालू झाली असल्याची ही या गावाची आशी पहिलीच वेळ झाली आहे त्या मुळे म्हैसगांव मधील दोन्ही पॅनल मध्ये भिती चे वातवरण निर्माण झाले आहे .

या बाबत असे की म्हैसगांव ग्रामपंचायत निवडणुक चालू झाली आहे या संपूर्ण गांवासाठी एकुण ९ सदस्य व १ सरपंच पद नशीब आजमावणारी आहे या साठी म्हैसगांव मधुन भाजप व विखे गट ,राष्ट्रवादी काँग्रेस ,वंचित बहुजन आघाडी असे तीन पक्ष रिंगणात उतरली आहेत . या तीन पक्ष पैकी गावातील एकुण १० उमेदवार उभी राहिली आहे त्या मध्ये सरपंच पद साठी २ अर्ज महिलानी दाखल केले आहे तर ग्रामपंचायत सदस्य साठी ८ अर्ज अर्ज दाखल करण्यात आले आहे . आज सरपंच व सदस्य पदासाठी किती अर्ज दाखल होतात या कडे पाहावा लागणार आहे . व एकुण किती उमेदवार रिंगणात येतात हे पहावा लागणार आहे .

प्रत्येक वर्षी त्यास त्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते त्यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी तयार झाली आहे कोणत्याही प्रकारचा बदल उमेदवारांमध्ये केला जात नाही ती सरपंच पद असो किंवा उपसरपंच पद असून सदस्य असो हे सर्व प्रत्येक वर्षी तेच तेच असतात याकडे गावातील सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे यावर्षी तरी यामध्ये काही बदल होतो की नाही की पुन्हा तेच उमेदवार आपले नशीब आजमावतात याकडे सर्व मतदारांचे लक्ष लावून आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!