येवला (जनता आवाज वृत्तसेवा):- मौजे कोटमगाव ता. येवला येथील श्री जगदंबा माता देवस्थान ट्रस्ट कोटमगाव खूर्द, यांच्यावतीने सालाबाद भव्य कीर्तनाचा व कथेचा धार्मिक, कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतो सालाबाद प्रमाणे घटी बसविणाऱ्यांना फराळाचे वाटप करून ग्राम दैवत, श्री. जगदंबा देवस्थान ट्रस्ट कोटमगाव खुर्द तालुका येवला जिल्हा नाशिक यांच्या वतीने विविध सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यात येते.
या ठिकाणी सर्व विविध उपक्रम सामाजिक धार्मिक व सर्व आरतीचा देखील कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करण्यात येतो संपूर्ण राज्यभरातील मोठ्या प्रमाणात नागरिकांची भाविक भक्तांची यात्रा उत्सवामध्ये खरेदी व. दर्शनासाठी गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते, नवसाला पावणारे जागृत देवस्थान, संपूर्ण नाशिक जिल्हा भरातील, मानले जाणारे, ग्राम दैवत श्री.महा काली श्री. महा लक्ष्मी श्री. महा सरस्वती ग्राम दैवत आपले सर्व समस्त, श्री. जगदंबा माता देवस्थान ट्रस्ट,विश्वस्त मंडळ, व ग्रामपंचायत कार्यालय, कोटमगाव खुर्द यात्रा उत्सव नियोजन समिती, ग्रामस्थ सर्व स्टाप कर्मचारी वर्ग, कोटमगाव खुर्द ता. येवला, यांच्या वतीने यात्रा उत्सवामध्ये , सर्व जागो जागी व्यवस्थित नियोजनबद्ध कार्यक्रम व सर्व ठिकाणी आपले लक्ष केंद्रित करून, सर्व समस्त विश्वस्त मंडळाने, सर्व ठीक ठिकाणी ग्रामपंचायत, कार्यालय, कोटमगाव, खुर्द मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड व. येवला शहर पोलीस ठाणे व तहसीलदार पंचायत समिती यांच्या वतीने सर्वच ठिकाणी व्यवस्था व सर्व सोयी- सुविधा नियोजन उपलब्ध करून दिलेले या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे येथील सर्वच समस्त, ग्रामस्थ, पंचक्रोशीतील, भविक भक्त परिवार, भजनी मंडळ, नियोजना वर पूर्ण पणे ठाम आहेत..



