राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहुरी मध्ये मा. नगराध्यक्षा डॉ .सौ उषाताई तनपुरे यांचे मार्गदर्शनाखाली भरविण्यात आलेल्या राहुरी दांडिया महोत्सव २०२३ या स्पर्धेत सोलो डान्स मध्ये भक्ती चुत्तर तर ग्रुप डान्स मध्ये गुज्जू मंडळाने प्रथम क्रमांकांचे बक्षीस मिळविले.
नवरात्रौत्सवाच्या निमित्त राहुरी येथील माजी नगराध्यक्षा डॉ सौ उषाताई तनपुरे ओजस्विनी पतसंस्थेच्या चेअरमन सौ सुजाता तनपुरे यांचे मार्गदर्शनाखाली भरविण्यात आलेल्या राहुरी दांडिया महोत्सव २०२३ मध्ये शहरातील १६०० महिला युवती यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत यशस्वी महिला युवतीना बक्षीसे वाटण्यात आली त्यात सोलो डान्स मध्ये भक्ती चुत्तर व आकांक्षा मंडलिक सोलो मोठा गटात भाग्यश्री बोर्डे हिस बक्षीसे मिळाली तर महिला गुज्जू मंडळ व लिटल स्टार मंडळास बक्षीस मिळाले ह्या बक्षीसाचे वाटप डॉ उषाताई तनपुरे सुजाता तनपुरे सोनाली तनपुरे व सायली तनपुरे व आरोही तनपुरे यांचे हस्ते वितरित करण्यात आले.राहुरीच्या नगर मनमाड राज्य मार्गांवरील विट्टला लॉन्स येथील भव्य हॉल मध्ये या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या.आकर्षक विद्युत रोशनाईनी नटलेल्या या हॉल मध्ये रंगीबेरंगी कपड्यात सजलेल्या नटलेल्या अनेक महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या. एक छान असा माहोल तयार झाला होता. ठिकठिकाणी महिला युवती हातात टिपऱ्या घेऊन नाचताना गाताना दिसत होत्या. या महोत्सवात अगदी लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. विविध गाण्याच्या ठेक्यावर तरुणाई नाचत होती.
विशेष म्हणजे या खेळात स्वतः डॉ उषाताई तनपुरे, सुजाता तनपुरे, सोनाली प्राजक्त तनपुरे, सायली हर्ष तनपुरे याही यात सहभागी झाल्याने महिलांचा व युवतीच्या उत्सहात भर पडली. कार्यक्रम स्थळी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंट वर स्वतःचे ग्रुपचे फोटो घेण्यात अनेक जणी मशगुल झाल्या होत्या. सेल्फी पॉईंट हेह्या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण होते.या कार्यक्रमात पुरुष वर्गाला प्रवेश नसल्याने महिलांची याचा आनंद लुटला. कार्यक्रम स्थळी खाद्य पदार्थाचे स्टॉल लावण्यात आल्याने त्याचाही स्वाद अनेकांनी लुटला तसेच संयोजकांच्या वतीने उपस्थित महिलांना फराळ ठेवण्यात आला त्या ठिकाणी सर्वांचा आवडता बर्फीचा गोळा कुल्फीही ठेवण्यात आली होती.यावेळी अपर्णा ढमाळ, प्रीती चूत्तर ह्यांनी सौ सोनाली प्राजक्त तनपुरे यांचे मार्गदर्शना खाली अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते.



